-
आपल्या डान्सच्या कौशल्याने सर्वांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणून दीपाली सय्यद यांना ओळखले जाते.
-
दीपाली सय्यद या राजकीय क्षेत्रात सध्या चांगल्याच सक्रीय आहेत. ठाकरे गटातील दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
-
दीपाली सय्यद बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. या भेटीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.
-
मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली.
-
दीपाली सय्यद यांचा अभिनेत्या ते राजकारणी हा प्रवास कसा आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
-
दिपाली भोसले सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला. पण त्यांचे बालपण मुंबईत गेले.
-
दीपाली भोसले यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.
-
नृत्याची आवड असलेल्या दिपाली सय्यद यांनी २००६ मध्ये सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली.
-
त्यांनी छोट्या पडद्यावरुन मालिकांमध्ये काम करत सिनेसृष्टीत प्रवेश केला.
-
बंदिनी, समांतर या त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या मालिका होत्या.
-
त्यानंतर त्यांनी अनेक मराठी, हिंदी मालिकांसह जाहिरातीतही काम केले होतं.
-
दिपाली सय्यद या उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केल्या आहेत.
-
‘जाऊ तिथे खाऊ’, चष्मेबहाद्दूर, ‘लग्नाची वरात लंडनच्या दारात’ या चित्रपटामुळे त्या घराघरात पोहोचली. या चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजल्या.
-
‘जत्रा’ या चित्रपटातील ‘ये गो ये, ये मैना’ या गाण्यातही ती झळकली होती. तिचे हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते.
-
दीपाली भोसले यांनी २००८ मध्ये दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केले.
-
लग्नानंतर मात्र त्या अभिनय क्षेत्रात फारशा रमल्या नाहीत. त्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये मात्र काम करताना दिसल्या.
-
करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवऱ्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला या चित्रपटात काम केले होते.
-
त्याबरोबर काळशेकर आहेत का ? मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासू नंबरी जावई दस नंबरी या चित्रपटातही तिने अभिनय केला आहे.
-
दुर्वा, अफलातून या हिंदी मालिकेतही ती झळकली.
-
तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
-
दीपाली सय्यद यांनी कालांतराने राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
-
२०१४ मध्ये त्यांनी अहमदनगरमधून आम आदमी पक्षातून निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
-
त्यानंतर काही दिवसांनी दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता.
-
अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी काही दिवस आंदोलन केलं. ज्या आंदोलनाची चर्चा झाली होती.
-
पण त्यानंतर दीपाली सय्यद या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. २०१९ च्या निवडणुकीच्या काळात त्या पुन्हा चर्चेत आल्या.
-
दिपाली सय्यद यांनी २०१९ च्या निवडणुकीदरम्यान उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हातावर शिवबंधन बांधून घेतले.
-
दीपाली सय्यद यांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा हा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
-
त्यावेळी निवडणुकीसाठी दीपाली सय्यद यांनी ‘सोफिया जहांगीर सय्यद’ नावाने होर्डिंग्ज लावले होते. हा प्रचार केल्यामुळे सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.
-
दरम्यान दीपाली सय्यद या लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?