-
अभिनेता रणवीर सिंग क्रिकेटचा मोठा चाहता आहे.
-
त्याने ‘८३’ या चित्रपटामध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
-
नुकतीच त्याने दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांची भेट घेतली.
-
रणवीर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या भेटीदरम्यानचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
रणवीर आणि एबी डिव्हिलियर्सचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ते दोघे गप्पा मारत असल्याचे दिसते.
-
या फोटोंना त्याने “आजची दुपार मस्त होती. मिस्टर ३६० सारख्या दिग्गज खेळाडूसह क्रिकेटवर गप्पा मारल्या”,असे कॅप्शन दिले आहे.
-
त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. त्यांनी या फोटोंखाली कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
मागच्या वर्षी एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून संन्यास घेतला. (सर्व फोटो – Ranveer singh instagram)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य