-
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
-
मागच्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएब एकत्र राहत नसल्याची चर्चा आहे.
-
सानिया मुलगा इझानबरोबर राहतीये.तर शोएब एकटाच राहत असल्याच्या बातम्या येत आहेत.
-
अशातच सानिया आणि शोएबच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
सानिया आणि शोएबने प्रेमविवाह केला होता.
-
काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही १२ एप्रिल २०१० रोजी लग्न बंधनात अडकले होते.
-
लग्नात शोएबने काळी शेरवानी परिधान केली होती.
-
तर, सानिया लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये खूप सुंदर दिसत होती.
-
दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं.
-
नंतर पाकिस्तानमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
-
दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान सानिया व शोएबचे लग्नातील फोटो त्यांचे फॅन्स शेअर करत आहेत.
-
मात्र, घटस्फोटांबद्दल शोएब किंवा सानियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (फोटो इंडियन एक्सप्रेस व Sania Mirza fanpage Facebookवरून साभार)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”