-
एक काळ असा होता की रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नातेसंबंधांची बरीच चर्चा व्हायची.
-
आज काळ बदलला असला तरीही या तिघांबद्दल जाणून घेण्यास चाहते तेवढेच उत्सुक असतात.
-
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना अनेकदा रेखा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
पण जया बच्चन यांच्याबाबत मात्र त्या फार कमी वेळा बोलल्या आहेत.
-
एका मुलाखतीत रेखा यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या दोघींमधील संबंध कसे आहेत हे सांगितलं होतं.
-
रेखा यांना सिमी ग्रेवालच्या मुलाखतीत जया बच्चन यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांबाबत विचारण्यात आलं होतं.
-
त्यावर रेखा म्हणाल्या, “मला असं अजिबात वाटत नाही की जया बच्चन यांना कधी असुरक्षित वाटत असेल किंवा त्या बिचाऱ्या आहेत.”
-
“आम्ही दोघी जेव्हाही भेटतो तेव्हा त्याही तेवढ्याच उत्साही असतात” असंही रेखा यावेळी म्हणाल्या होत्या.
-
दरम्यान रेखा आणि जया यांच्यात फारसे मैत्रीपूर्ण संबंध नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे पण एकेकाळी त्या दोघीही रुममेट होत्या.
-
यासिर उस्मान यांच्या ‘रेखा – कैसी पहली जिंदगानी’ या पुस्तकात, ‘जेव्हा जया बच्चन यांचं लग्न झालं नव्हतं आणि रेखाही मुंबईत नवीन होत्या तेव्हा दोघेही एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहत असत.’ असा दावा करण्यात आला आहे.
-
(फोटो साभार- सोशल मीडिया)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य