-
आज बोनी कपूर यांचा वाढदिवस आहे. ते बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत.
-
त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’, ‘वॉन्टेड’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.
-
चित्रपटांसह त्यांचे खासगी आयुष्यही नेहमी चर्चेत राहिले.
-
१९८३ मध्ये त्यांनी मोना कपूर यांच्याशी विवाह केला होता.
-
कामाच्या संदर्भामध्ये ते श्रीदेवी यांना भेटले आणि त्यांच्या प्रेमात पडले.
-
पुढे १९९६ मध्ये मोना कपूर यांना घटस्फोट देऊन त्यांनी श्रीदेवींशी लग्न केले.
-
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेमकहाणी फार रंजक आहे.
-
बोनी कपूर यांनी श्रीदेवींना चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले होते.
-
पाहताक्षणी बोनी त्यांच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते.
-
तेव्हा ‘श्रीदेवी यांना मी माझ्या चित्रपटाची नायिका म्हणून घेणार’ असा निर्धार त्यांनी केला होता.
-
त्यावेळी श्रीदेवींच्या चित्रपटाच्या तारखा आणि बाकी सर्व व्यवहार त्यांच्या आई पाहत असत.
-
म्हणून श्रीदेवींच्या आईंना भेटण्यासाठी ते चेन्नईला गेले होते.
-
तेव्हा ‘चित्रपटासाठी दहा लाख रुपये मानधन म्हणून द्यावे लागतील, असे त्या (श्रीदेवी यांच्या आई) म्हणाल्या होत्या.
-
त्यावर बोनी कपूर उत्साहाच्या भरामध्ये ‘फक्त १० काय, ११ लाख देईन’, असे म्हणाले होते.
-
त्यानंतर त्यांची भेट झाली आणि ‘मिस्टर इंडिया’मध्ये काम करण्यास श्रीदेवी यांनी होकार कळवला.
-
पुढे हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमांमध्ये झाले.
-
हिंमत करुन त्यांनी श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली.
-
त्यांना जान्हवी आणि खुशी अशा दोन मुली आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल