-
तब्बल ११ वर्षांपूर्वी इम्तियाज अली दिग्दर्शित ‘रॉकस्टार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हाच्या प्रेक्षकांच्यानुसार तो काळाच्या पुढचा चित्रपट होता जयाविषयी आजही तितकंच आवडीने बोललं जातं.
-
जसा प्रत्येक पिढीला त्यांचं नेतृत्व करणारा सुपरस्टार मिळाला, तसंच रणबीर कपूरच्या रूपात आजच्या पिढीला त्यांचा सुपरस्टार गवसला.
-
रणबीर ‘सावरिया’चं चित्रीकरण करत होता तेव्हाच त्याला ‘रॉकस्टार’च्या संकल्पनेबद्दल समजलं होतं आणि यासाठी त्याने इम्तियाजकडे या चित्रपटासाठी विचारणा देखील केली.
-
पहिले काही महीने काहीच घडलं नाही, पण रणबीर याविषयी एवढा उत्सुक आहे हे समजताच पुढच्या काही महिन्यात इम्तियाज अलीने ‘रॉकस्टार’वर काम करायला सुरुवात केली.
-
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री नर्गिस फखरीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. ती हिंदी भाषेबद्दल तसेच चित्रपटसृष्टीबद्दल पूर्णपणे अज्ञात होती. तिला अमिताभ बच्चन म्हणजे कोण हेदेखील ठाऊक नव्हतं.
-
रणबीरचं यातलं पात्र लोकप्रिय रॉक सिंगर, कवि आणि गीतकार जीम मॉरिसन यांच्यापासून प्रेरित होतं आणि याला एक भारतीय टच देण्यात इम्तियाजला चांगलंच यश मिळालं.
-
या चित्रपटाचं संगीत ऑस्कर विजेत्या ए.आर. रहमान यांचं होतं. रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला चार चाँद लावले. आजही यातली सगळी गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
-
चित्रपट हा पूर्णपणे संगीतावर बेतलेला असल्याने रणबीरने यासाठी गिटार वादनाचं प्रशिक्षण घेतलं, शिवाय प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान रणबीर रहमानबरोबर हजर असायचा.
-
जुन्या काळातील रॉकस्टारचंसुद्धा या चित्रपटात दर्शन झालं. शम्मी कपूर यांची छोटीशी भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.
-
एका गायकाचा संघर्ष तसेच त्याला एका प्रेम कहाणीची जोड हे समीकरण लोकांना प्रचंड भावलं. शिवाय हा चित्रपट उलटा म्हणजेच शेवटाकडून सुरुवातीकडे असा चित्रित केला गेला आहे. त्यामागील कारण म्हणजे रणबीरच्या हेअर स्टाइलमध्ये बदल नको हवे होते म्हणून.
-
पूर्णपणे संगीतावर आधारित फार कमी चित्रपट बनले आहेत त्यापैकी रॉकस्टार हा एक मैलाचा दगड मानला जातो.
-
या चित्रपटाने प्रेक्षकांचा चित्रपट या माध्यमाकडे बघायचा दृष्टिकोन दृष्टिकोन बदलला. सुरुवातीला हा चित्रपट फारसा कुणाला समजला नाही पण हळूहळू त्यातली फिलॉसॉफी लोकांना उमगत गेली. (फोटो सौजन्य : फेसबुक आणि इंडियन एक्सप्रेस)
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचे निधन