-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे. ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.
-
जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
‘कुसुम’ या लोकप्रिय मालिकेतून सिद्धांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
-
‘वारिस’, ‘सूर्यपूत्र कर्ण’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘कयामत’, ‘विरुद्ध’ या मालिकांमुळे सिद्धांत घराघरात पोहोचला.
-
‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘जिद्दी दिल माने ना’ या मालिकेत सिद्धांत शेवटचा झळकला होता.
-
सिद्धांत वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला होता.
-
सिद्धांतने २००० साली ईरा सुर्यवंशीसह लग्नगाठ बांधली होती. १५ वर्षांनंतर २०१५ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळं झाले.
-
सिद्धांत व ईराला डिजा ही मुलगी आहे. घटस्फोटानंतरही मुलीबरोबर त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
-
मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतचं त्याची सहकलाकार प्रिया भटीजाबरोबर अफेअर होतं. प्रियामुळेच त्याने पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं.
-
२०१७ साली सिद्धांतने ‘खतरो के खिलाडी’ फेम रशियन मॉडेल अलिशिया राऊतसह विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
-
अलिशियाचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.
-
सिद्धांत हा फिटनेस फ्रिक होता. शरीराकडे तो विशेष लक्ष द्यायचा. त्याने केलेली शेवटची पोस्टही फिटनेसच्या बाबतीतच होती.
-
सिद्धांत त्याच्या परिवारासाठी एकूण पाचे ते दहा कोटींची संपत्ती सोडून गेला असल्याची माहिती आहे.
-
(सर्व फोटो : सिद्धांत सुर्यवंशी/ इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO