-
सध्या बिग बॉसच्या १६ व्या सीजनची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक कलाकार बिग बॉसमध्ये येऊन प्रकाशझोतात येतात. तर काहींना इतकी प्रसिद्धी मिळते की ते नॅशनल क्रश होतात, कोणते आहेत असे कलाकार जाणून घ्या.
-
मनवीर गुज्जर : मनवीर गुज्जरने बिग बॉसच्या दहाव्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता. मनवीरच्या निर्भीड खेळाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याने खेळामध्ये कोणताही आव आणला नाही, तो जसा आहे तसाच तो पूर्ण खेळात दिसला. त्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाने प्रेक्षकांची मन जिंकली.
-
थोड्याच दिवसात मनवीर प्रकाशझोतात आला आणि दहाव्या सीजनचा विजेता ठरला.
-
मनु पंजाबी : मनु पंजाबीने देखील बिग बॉसच्या दहाव्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता.
-
या सीजनमध्ये मनु आणि मनवीरची मैत्री सर्वात चर्चेत राहिली होती. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा भेटल्यानंतरही त्यांच्यात इतकी घट्ट मैत्री झालेली पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
-
प्रत्येक खेळ जिंकण्यासाठी मनु ज्याप्रकारे योजना आखत असे, त्याच्या या कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
आसिम रियाज : आसिम रियाजने तेराव्या सीजनमध्ये सहभाग घेतला होता.
-
त्याच सीजनचा विजेता ठरलेल्या सिद्धार्थ शुक्लाबरोबर आसिमची मैत्री आणि नंतरच्या दिवसांमधील भांडणं दोन्ही चर्चेचा विषय ठरली होती.
-
आसिमच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तो टॉप ५ स्पर्धकांपैकी एक होता.
-
सिद्धार्थ शुक्ला : सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसमध्ये येण्यापुर्वी लोकप्रिय अभिनेता होता, पण तरी बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याचा चाहतावर्ग आणखी वाढला.
-
सिद्धार्थच्या प्रत्येक खेळ खेळण्याच्या जिद्दीने आणि योग्य पद्धतीने खेळ समजुन घेण्याच्या वृत्तीमुळे त्याला १३ व्या सीजनचा विजेता बनवले.
-
सिद्धार्थ आणि शेहनाज गिलची जोडी हा या सीजनमध्ये सर्वात चर्चेत असलेला विषय होता.
-
शेहनाज गिल : शेहनाज गिलने स्वतःला ‘पंजाबची कॅटरीना कैफ’ म्हणत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तिचा हा आत्मविश्वास कायम असलेला दिसून आला.
-
बिग बॉसमुळे शेहनाजचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.
-
सिद्धार्थ आणि शेहनाजची केमिस्ट्री हा १३ व्या सीजनचा सर्वात चर्चेत असणारा विषय होता. त्यांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
-
अब्दु रोजिक : सध्या सुरू असणाऱ्या १६ व्या सीजनमध्ये अब्दु रोजिक हे नाव चर्चेत आहे.
-
अब्दु रोजिकचे वय १८ वर्ष असून, तो प्रसिद्ध गायक आहे. तो मुळचा ताजिकिस्तानचा आहे.
-
अब्दु रोजिकच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. बिग बॉसमुळे त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”