-
‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’सारखे चित्रपट देणारे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
-
याबरोबरच प्रवीण हे उत्तम अभिनेते म्हणूनसुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत.
-
त्यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपटही लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतला.
-
शिवाय प्रसाद ओकबरोबरच्या ‘धर्मवीर’ चित्रपटानेही सगळे रेकॉर्ड मोडीत काढले.
-
प्रवीण आणि त्यांची पत्नी हे दोघेही अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.
-
नुकताचा प्रवीण तरडे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भरपुरू शुभेच्छा दिल्या आहेत.
-
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रवीण तरडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
-
रात्री उशिराने चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण तरडे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण तरडे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भव्य प्रतिमा भेट म्हणून दिली.
-
प्रवीण तरडे यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.
-
अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाईसुद्धा या प्रसंगी उपस्थित होते.
-
चंद्रकांत पाटील यांनी शेअर केलेल्या फोटोमधून प्रवीण तरडे आणि त्यांचे अत्यंत उत्तम घनिष्ट संबंध आहेत असं स्पष्ट होत आहे.
-
चंद्रकांत पाटील आणि उपस्थित असलेल्या लोकांबरोबर बुलेटवर केक कापत प्रवीण तरडे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
-
सोशल मीडियावर हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : चंद्रकांत पाटील आणि प्रवीण तरडे / फेसबुक)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल