-
बिपाशा बासूने नुकतंच तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे.
-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर हे दोघेही सातत्याने चर्चेत होते.
-
अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता त्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
बिपाशा-करणचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. हे दोघांच्या फोटो आणि पोस्टवरून लक्षात येतंच.
-
बिपाशा आणि करणची प्रेमकहाणी तितकीच गंमतीशीर आहे.
-
२०१५ सालामध्ये आलेल्या ‘अलोन’ या सिनेमावेळी बिपाशा आणि करणची भेट झाली होती.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी अफवा तेव्हा पसरवण्यात आली.
-
अफवेचेनंतर सत्यात रूपांतर झाले आणि हे दोघे खरोखरचे एकमेकांना डेट करू लागले.
-
बिपाशा-करणने २०१६मध्ये थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर ६ वर्षांनंतर ते आता आई बाबा बनले आहेत.
-
आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा आल्याने दोघे अत्यंत खुश आहेत.
-
लग्नापूर्वीच करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत होता. हे त्याचं तिसरं लग्न आहे.
-
सध्या हे दोघं त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये रमले आहेत.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल