-
‘जब तक है जान’ हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा असे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये होते.
-
भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्याची प्रेमकथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
-
आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटाबद्दलच्या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.
-
यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट आहे. चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतर त्याचे २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
-
या चित्रपटामध्ये ‘वीर झारा’ (२००४) नंतर तब्बल आठ वर्षांनी यश चोप्रा पुन्हा दिग्दर्शन म्हणून काम करत होते.
-
या चित्रपटाद्वारे शाहरुख आणि कतरिनाने पहिल्यांदा एकत्र काम केले.
-
‘जब तक है जान’ हा एकमेव चित्रपट सोडल्यास यश चोप्रा यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये लता दिदींनी पार्श्वगायन केले आहे.
-
शाहरुख चित्रपटामध्ये ‘तेरी आंखों की नमकीन तेरी…. जब तक है जान’ ही कविता सतत म्हणत असतो. ही कविता यश चोप्रा यांच्या मुलाने म्हणजेच आदित्य चोप्राने लिहिली आहे.
-
या चित्रपटात शाहरुखने कतरिनाला किस केले होते. हा त्याच्या कारकीर्दीमधला पहिला ऑनस्क्रीन किसिंग सीन होता.
-
ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बऱ्याच वर्षांनंतर ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली होती.
-
प्रदर्शनाच्या मुद्द्यावरुन हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. २०१२ सालच्या दिवाळसणाला ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ हे दोन बिगबजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आले होते. (सर्व फोटो – फेसबूक आणि द इंडियन एक्सप्रेस)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल