-
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या कामाहूनही जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
-
ती खूप देवभक्त आहे.
-
नुकतीच ती तिच्या आईबरोबर वाराणसी येथे गेली होती.
-
त्या वेळेचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
यावेळी तिने गंगा आरतीचाही आनंद घेतला.
-
तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती गंगा घाट येथे बसून तिच्या आईबरोबर गंगा आरतीचा अनुभव घेताना दिसत आहे.
-
या गंगा आरतीत सहभागी होताना तिने पंचारतीसाठी मेणबत्तीने दिवेही लावले.
-
तसेच नंतर तिने गंगेचेही दर्शन घेतले.
-
यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि गंगा आरतीमुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे ती भारावून गेली.

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली