-
बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. आज त्यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी १४ नोव्हेंबर २०१८ सालामध्ये लग्नगाठ बांधली.
-
रणवीर आणि दीपिकाच्या ऑन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचे अनेक चाहते आहेत. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.
-
दीपिका आणि रणवीर दोघेही नेहमी एकमेकांविषयी विविध गोष्टींचा खुलासा करत असतात.
-
काही महिन्यांपूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत त्यांचे बेडरुम सिक्रेट शेअर केले होते.
-
यावेळी तिने रणवीरबाबत आश्चर्यकारक खुलासा केला होता.
-
दीपिका आणि रणवीर यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले.
-
या कार्यक्रमात दीपिकाला रणवीरच्या स्टाईल आणि ब्युटी सिक्रेट्सबद्दल विचारण्यात आले होते.
-
या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिकाने तिचे बेडरुम सिक्रेट उघड केले. तिचे हे उत्तर ऐकून रणवीर थक्क झाला.
-
यावेळी दीपिकाला रणवीरच्या स्टाईल आणि ब्युटीबद्दल विचारले असता ती म्हणाली, “रणवीर हा बराच वेळा शॉवर घेतो. तसेच तो टॉयलेटमध्ये बराच वेळ असतो.”
-
“विशेष म्हणजे तो बेडवरही बराच वेळ घेतो.” असेही ती म्हणाली. तिचे हे उत्तर ऐकताच सर्वजण गोंधळले.
-
दीपिका नक्की काय बोलली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर दुसरीकडे रणवीर हा दीपिकाच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता.
-
त्यानंतर दीपिकाने फार स्मार्टरित्या तिच्या या वाक्यावर स्पष्टीकरण दिले. ‘रणवीर बेडवर झोपायला ही बराच वेळ घेतो’ असे ती म्हणाली.
-
दरम्यान तिच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
-
दीपिका ही लवकरच ‘फायटर’ आणि ‘पठाण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
-
तर दुसरीकडे रणवीर सिंग हा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
तनिष्क ज्वेलर्समध्ये दिवसा-ढवळ्या जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं २५ लाखांचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का