-
कधी रोमँटिक हिरो तर कधी मुलींना गंडा घालणारा तर कधी खलनायक, अशा भूमिका करणारा अभिनेता रणवीर सिंग. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
-
रणवीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नुकतंच त्याला मारकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये इतोल आयडॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
-
इतकंच नाही तर या सोहळ्यात त्याला अभिनयाचा मास्टरक्लासचं सूत्रसंचालन करण्याची संधीदेखील मिळाली.
-
रणवीरने नुकतंच या सोहोळयातील काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
नेहमीप्रमाणेच रणवीरने त्याच्या हटके अवतारात या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
त्याच्या ड्रेसची आणि एकूणच त्याच्या या स्टाईलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
हा पुरस्कार मिळाल्याने रणवीर अत्यंत खुश आहे आणि या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.
-
माराकेश इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा जगभरातील जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.
-
या चित्रपट महोत्सवात रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील ‘बाजीराव मस्तानी’, ‘गली बॉय’ आणि ‘पद्मावत’ हे तीन उत्कृष्ट चित्रपटही दाखवले जाणार आहेत.
-
रणवीरने या कार्यक्रमात प्रचंड धमाल केली आणि तिथल्या प्रेक्षकांचंही खूप मनोरंजन केलं हे या फोटोवरुन दिसत आहे.
-
तिथल्या ‘वॉल ऑफ फेम’वर आपली पत्नी दीपिका पदूकोणचा फोटो पाहून रणवीरला तिचा अभिमान वाटला आणि त्याने टो फोटो शेअरदेखील केला आहे.
-
शिवाय दीपिकाबरोबर तिथेच शाहरुख खानचा फोटो पाहून रणवीर आणखी आनंदी झाला.
-
कित्येक दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांची रणवीरने भेट घेतली.
-
रणवीरचे हे फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
रणवीर हा लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / रणवीर सिंग)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”