-
मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाचा ठसा उमटवत प्राजक्ताने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली.
-
प्राजक्ताने २०११ साली ‘सुवासिनी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
-
त्यानंतर प्राजक्ता ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा’ या मालिकेतही दिसली होती.
-
छोट्या पडद्याप्रमाणेच प्राजक्ताने रुपेरी पडदाही गाजवला.
-
‘पावनखिंड’, ‘लकडाऊन लग्न’ या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
‘रानबाझार’ या वेब सीरिजमधून प्राजक्ताने ओटीटीवर पदार्पण केलं.
-
आज बालदिनाच्या निमित्ताने आपल्या अभिनयनाबरोबरच सौंदर्यानेही प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या लाडक्या प्राजूचे बालपणीचे फोटो पाहूयात.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडणारी प्राजक्ता लहानपणीही अगदी गोड दिसायची.
-
प्राजक्ता कुठल्याही पेहरावात अगदी खुलून दिसते. लहानपणापासूनच तिला कमालीचा फॅशन सेन्स होता, हे या फोटोतून दिसून येतं.
-
आजीबरोबरचा हा खास फोटो प्राजक्ताने शेअर केला होता.
-
प्राजक्ताला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिने सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती.
-
प्राजक्ताचा हा भरतनाट्यमचा फोटो १३व्या वर्षीचा आहे.
-
दोन वर्षांची टोपी घातलेली छोटी प्राजू.
-
नऊवारी साडीत बालपणीही प्राजक्ता तितकीच गोड दिसायची.
-
प्राजक्ताला एक भाऊही आहे. त्याच्याबरोबरचे बालपणीचे अनेक फोटोही तिने शेअर केले आहेत.
-
लाडक्या भावाबरोबरच्या सगळ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘सहोदर’ असं लिहीलं आहे.
-
‘व्वा दादा व्वा’ असं म्हणणाऱ्या प्राजक्ताचा भावाबरोबरचा क्यूट फोटो.
-
दोन वेण्या घातलेली बालपणीची प्राजक्ता.
-
प्राजक्ताने तिच्या भावाच्या वाढदिवसाचा हा फोटोही शेअर केला होता.
-
‘वेड्या बहिणीची वेडी माया’.
-
प्राजक्ता आणि तिची आई.
-
प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. (सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख