-
कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे.
-
गेले काही दिवस कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातील काही चित्रपटांचे शूटिंग त्याने पूर्ण केले असून ते प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.
-
कार्तिक सध्या चर्चेत आहे. ‘हेरा फेरी ३’ चित्रपटात आता अक्षयच्या जागी तो दिसणार अशी चर्चा आहे. याआधीदेखील कार्तिकने काही अभिनेत्यांना रिप्लेस केलं आहे.
-
‘लव आज कल’ या चित्रपटात सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता मात्र दुसऱ्या भागात कार्तिक आर्यनने बाजी मारली. दोन्ही चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिग्दर्शित केले होते.
-
नव्व्दच्या दशकात ‘आशिकी’ चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
-
आशिकीच्या निर्मात्यांनी आता तिसऱ्या भागाची घोषणा केली असून त्यात कार्तिक आर्यन दिसणार आहे.
-
या चित्रपटाचा पुढील भाग २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या भागात आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते.
-
‘हेरा फेरी ३’च्या आधी ‘भुलभुलैय्या २’ चित्रपटात कार्तिक आर्यन दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याच्या पहिल्या भागात अक्षय कुमार होता. पहिला भाग प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता.
-
कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो दिसणार आहे.
-
कार्तिक आर्यन सध्या अनेक चित्रपटांच्या पुढील भागात दिसत असला तरी काही चित्रपटांमधून त्याला काढण्यात आले आहे.
-
करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ चित्रपटात तो दिसणार होता, मात्र त्याला काही सीन्स न पटल्याने त्याने हा चित्रपट सोडला.
-
दरम्यान, ‘फ्रेडी’ व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे ‘शहजादा’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ हे चित्रपट आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम , इंडियन एक्सप्रेस

Supriya Sule : “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता…”, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी पवार कुटुंब एकत्र येणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…