-
सध्या मराठी मालिकांमध्ये प्रमुख कलाकारांपेक्षा छोटे बालकलाकार जास्त भाव खाऊन जातात. हे बालकलाकार सोशल मीडियावरही लोकप्रिय आहेत. आज बालदिनाच्या निमित्ताने आपण मराठी मालिकांविश्वातील प्रसिद्ध बालकलाकारांची माहिती घेणार आहोत.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये मायरा वैकुळ परीची भूमिका साकारते. तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
साईशा भोईर सध्या झी मराठीच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेमध्ये चिंगीचे पात्र साकारते. याआधी ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमध्ये झळकली होती.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका सध्या स्टार प्रवाहवर सुरु आहे. यामध्ये अवनी जोशी पिहू ही भूमिका निभावत आहे.
-
या मालिकेमध्ये अवनी तायडे स्वराज आणि स्वरा या दोन्ही भूमिका तिने साकारल्या आहेत.
-
‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमामुळे हर्षद नायबळ खूप लोकप्रिय झाला होता.
-
साईशा साळवी ही ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमध्ये जयदीप-गौरीच्या मुलीची, लक्ष्मीची भूमिका साकारत आहे.
-
राजवीरसिंह गायकवाडने साकारलेली लाडू ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.
-
साईशाने ‘रंग माझा वेगळा’ मालिका सोडल्यानंतर तेथे मैत्रेयी दातेची वर्णी झाली. ती कार्तिकीचे पात्र निभावत आहे.
-
स्पृहा दळीने दीपिका ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये अभ्या आणि लतिका यांच्या मुलीची भूमिका आदिरा औंधकरने केली आहे.
-
आर्यन देवगिरीने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अथर्व हे पात्र साकारले होते.
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास