-
अभिनेते अनिल कपूर यांची लाइफस्टाईल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्यांनी त्यांचं घर कसं आहे ते चाहत्यांशी शेअर केलं आहे.
-
त्यांच्या घराला त्यांनी मॉडर्न पण प्राचीन अशा कॉम्बिनेशन मध्ये लूक दिला आहे.
-
त्यांच्या घरातील अधिकाधिक फर्निचर हे सागवानी लाकडापासून तयार केलं आहे.
-
त्यांच्या घराला वरच्या मजल्यावरील खोलीत जाण्यासाठी आतून जिनाही आहे. त्या जिन्यालाही अत्यंत सुंदर डिझाईन आहे.
-
अनिल कपूर यांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांची पुस्तकं ठेवण्यासाठी ही एक खास जागा तयार केली आहे.
-
त्यांचा कुटुंब मोठा आहे त्यांच्या घरी अनेक गेट-टुगेदर होत असतात. सगळ्यांना एकत्र मिळून जेवता यावं यासाठी त्यांच्या घरी एक मोठं लाकडी डायनिंग टेबल आहे.
-
अनिल कपूर यांना फिटनेसची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या घरी एक स्वतंत्र जिम तयार करण्यात आली आहे.
-
घरी असल्यावर अधिकाधिक वेळ अनिल कपूर या जिममध्ये घालवतात असं त्यांनी सांगितलं.
-
त्यांच्या घराला एक छोटीशी गच्ची आहे तिथेही त्यांनी भरपूर झाडं लावली आहेत.
-
तसंच त्या गच्चीत त्यांनी एक सोफा सेटही ठेवला आहे.
-
तसंच त्यांच्या घरी गणपतीची एक मोठी मूर्ती आहे. आणि त्या मूर्ती समोर दोन मोठ्या समयाही आहेत
-
त्यांच्या अंगणात भरपूर झाडं आहेत. या सगळ्यामुळे त्यांच्या घरी नेहमी प्रसन्न वातावरण असते.
सर्व फोटो सौजन्य : आशियन पेंट्स (यू ट्यूब)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”