-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अल्पावधीतच अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
सोनाली सौंदर्य आणि तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना कायमच भूरळ पाडत असते. तिच्या वेगवेगळ्या लुक्सची चर्चा होत असते.
-
नुकतीच ती आपल्या कुटुंबाबरोबर वाघा बॉर्डर अंतर येथे गेली होती. तिकडचे फोटो तिने शेअर केले आहेत.
-
‘कित्येक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
वाघा बॉर्डर ही भारत पाकिस्तान या देशाची सीमा आहे. भारताची शेवटची हद्द मानली जाते.
-
या बॉर्डरवर रोज ‘बीटिंग द रिट्रीट सेरेमनी’ (Beating Retreat Ceremony) हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
-
या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. हे संचलन पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात.
-
करोनामुळे गेली २ वर्ष ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यास उपस्थित राहण्यास प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली होती.
-
आता ही बंदी उठवण्यात आली असून हा सोहळा पाहण्यासाठी भारतीय नागरिकांबरोबर पाकिस्तानी नागरिकही मोठी गर्दी करतात.
-
वाघा बॉर्डरपासून पाकिस्तानचे लाहोर हे शहर २२ कि.मी. वर आहे.
-
सोनालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
सध्या सोनाली ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका