-
प्रियांका चोप्राचा पती निक जोनस हॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता आहे. अभिनयासह तो संगीत क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.
-
निक सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये निकने त्याला वयाच्या १३ व्या वर्षापासून टाईप १ मधुमेहाचा त्रास सहन करत असल्याची घोषणा केली.
-
निकप्रमाणे मनोरंजन सृष्टीतील अन्य काही सेलिब्रिटीसुद्धा या आजाराचा सामना करत आहेत.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना टाईप २ चा मधुमेह आहे.
-
समांथा रुथ प्रभू या आजाराने त्रस्त आहे. २०१३ मध्ये तिच्या मधुमेहाचे निदान झाले होते.
-
अभिनेता टॉम हॅक्स देखील टाईप २च्या मधुमेहाचा सामना करत आहेत. यासाठी त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना टाईप १ चा मधुमेह आहे.
-
१७ वर्षांची असताना सोनम कपूरच्या मधुमेहाचे निदान झाले होते. तिला टाईप १ मधुमेह आहे.
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…