-
विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा म्हणजेच आराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे. ती ११ वर्षांची झाली आहे.
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे आराध्यावर जिवापाड प्रेम करतात.
-
ते अनेकदा त्यांच्या नातीबद्दल बोलताना दिसतात.
-
अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत आराध्याच्या जन्माची कहाणी सांगितली आहे.
-
यावेळी आराध्याने ती कोणासारखी दिसते याबद्दलही सांगितले आहे.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नानंतर चार वर्षांनी आराध्याचा जन्म झाला. तिचा जन्म २०११ मध्ये झाला आहे.
-
यानंतर अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत आराध्याबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी ती कोणासारखी दिसते याबद्दल सांगितले होते.
-
त्यानंतर पुढे त्यांनी ऐश्वर्याने जेव्हा आराध्याला जन्म दिला त्यावेळीची गोष्ट सांगितली.
-
“आम्ही १४ नोव्हेंबर २०११ च्या रात्री ऐश्वर्याला रुग्णालयात घेऊन गेलो होतो.”
-
“त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की बाळाचा जन्म कधीही होऊ शकतो.”
-
“पण १६ नोव्हेंबर २०११ ला तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली.”
-
“हल्ली अनेकजण सी सेक्शन डिलिव्हरी करण्यास प्राधान्य देतात. पण ऐश्वर्याला तिची प्रसूती नॉर्मल पद्धतीने व्हावी, असे वाटतं होतं.”
-
“त्यामुळे तिने सी-सेक्शनद्वारे डिलिव्हरी करण्यास नकार दिला होता.”
-
“मात्र नॉर्मल प्रसूतीदरम्यान तिला प्रचंड वेदना झाल्या. पण मला तिचे फार कौतुक आहे.”
-
“कारण तिने जवळपास २ ते ३ तास त्यांना प्रसूतीदरम्यानच्या वेदना सहन केल्या.”
-
“यावेळी तिने कोणत्याही प्रकारच्या पेनकिलर घेण्यासही नकार दिला होता”, असे अमिताभ बच्चन म्हणाले.
विद्यार्थ्याशी वर्गातच लग्न केलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं महिला प्राध्यापिकेनं घेतला मोठा निर्णय