-
बॉलिवूड आणि क्रिकेटच्या कनेक्शनबद्दल जेव्हाही बोललं जातं तेव्हा चर्चा तर होतातच.
-
आताही अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुबमन गिल ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच दोघंही फ्लाइटमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
नुकतंच एका चॅट शोमध्ये शुबमन गिलने या डेटिंगच्या चर्चांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं.
-
सारा अली खान आणि शुबमन गिल यांच्या डेटिंगच्या चर्चां पुन्हा होत आहेत कारण एका मुलाखतीत शुबमनने साराचं नाव घेतलं.
-
प्रीती आणि निती सिमोस यांचा चॅट शो ‘दिल दियां गल्ला’मध्ये शुबमनला, ‘बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
या प्रश्नाचं उत्तर देताना शुबमनने अभिनेत्री सारा अली खानचं नाव घेतलं.
-
यानंतर शुबमनला ‘तू साराला डेट करत आहेस का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्याने ‘हो कदाचित’ असं उत्तर दिलं होतं.
-
पण जेव्हा शुबमनला पुन्हा एकदा खरं खरं सांगण्यासाठी विचारणात आलं तेव्हा तो म्हणला, “मी खरंच तर बोललो, कदाचित हो किंवा कदाचित नाही.”
-
अर्थात सारा अली खानचं नाव कोणाशी जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.
-
याआधीही अनेकदा सारा अली खान डेटिंग आणि अफेअरच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे.
-
साराने २०१८ साली ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
-
त्यावेळी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती.
-
त्यावेळी साराचं नाव अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी जोडलं गेलं होतं.
-
पण साराचं नाव सर्वात आधी अभिनेता इशान खट्टरशी जोडलं गेलं होतं.
-
एका मुलाखतीत तिने बॉलिवूडमध्ये दोन अभिनेते असलेल्या भावांपैकी एकाला डेट करत असल्याचं म्हटलं होतं.
-
सारा अली खानने सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूरलाही डेट केलं आहे.
-
या दोघांच्या डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
सारा अली खान राजकीय नेते सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाबरोबरही रिलेशनशिपमध्ये होती.
-
साराने वीरबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण नंतर तिने ते डिलीट केले.
-
याशिवाय कार्तिक आर्यनबरोबर तिच्या डेटिंगची बरीच चर्चा झाली होती.
-
साराने करण जोहरच्या शोमध्येच कार्तिक आर्यन आवडत असल्याची कबुली दिली होती.
-
सारा आणि कार्तिक यांनी ‘लव्ह आज कल’मध्ये एकत्र काम केलं होतं.
-
या चित्रपटाच्या शूटिंग आणि प्रमोशनच्या वेळी दोघांचेही बरेच फोटो व्हायरल झाले होते.
-
पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांचंही ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.
-
(फोटो साभार- सारा, शुबमन इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”