-
दाक्षिणात्य कलाकार कायमच चर्चेत असतात. अल्लू अर्जुन, यश, कांतारा फेम रिषभ शेट्टी या अभिनेत्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
-
कालपासून आणखीन एका दाक्षिणात्य अभिनेत्याचे नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे अभिनेता नागा शौर्या.
-
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तो बेशुद्ध होऊन खाली पडला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
आदल्या दिवशीच्या डिहायड्रेशनमुळे तो बेशुद्ध झाला होता पण आता तो ठीक आहे, असे माध्यमांना कळवण्यात आले.
-
नागा शौर्या तेलगू चित्रपटसृष्टीतील तरुण अभिनेता आहे. २०११ पासून तो तेलगू चित्रपटसृष्टीतीत कार्यरत आहे.
-
चित्रपटाच्याआधी त्याने जाहिरातींमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी त्याला ५ वर्ष संघर्ष करावा लागला होता.
-
नागा २० नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. त्याची प्रेयसी अनुषा शेट्टी, जी बंगळूरुस्थित इंटिरिअर डिझायनर आहे.
-
शौर्याने ओहालु गुसागुसलादे (२०१४), डिक्कुलु चुडाकू रामय्या (२०१४), कल्याणा वैभोगमे (२०१६), ज्यो अच्युतानंद (२०१६), चलो (२०१८) यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.
-
नागा नुकताच ‘कृष्ण वृंदा विहारी’ या चित्रपटात दिसला होता. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल