-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या पतीसह पंजाबला फिरायला गेली आहे.
-
पंजाबशी तिचं खास नातं आहे. सोनालीच्या आईचा जन्म तेथे झाला आहे. त्या मूळच्या पंजाबी आहेत.
-
नुकतीच तिने अमृतसरमधील सुवर्णमंदिर या शीख धर्मीयांच्या पवित्र स्थानाला भेट दिली.
-
तेव्हाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने “आईचं माहेर, आमचं आजोळ, अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी सुवर्ण मंदिरमध्ये यायचो…”
-
“मग पुढे कॉलेजपासून दोन वर्षांतून एकदा…आणि मग पुढे ही gap वाढतंच गेली…”
-
“यंदा साधारण ६-७ वर्षांनी आलोय अमृतसरला … पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे”, असे लिहिले आहे.
-
सोनाली, पती कुणाल आणि बेनोडेकर कुटुंबाचा सुवर्णमंदिराच्या भेटीदरम्यानचा फोटो.
-
काही दिवसांपूर्वी सोनाली तिच्या आजोळच्या गावी गेली होती.
-
तेव्हा तिने शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला.
-
तिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो – Sonalee Kulkarni/ instagram)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका