-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात बऱ्याचदा खटके उडाले आहे. कधी चित्रपटावरुन तर कधी पाकिस्तानी खेळाडूंवरुन या दोघांमधले मतभेद समोर आले आहेत.
-
आज आपण एक असा किस्सा जाणून घेणार आहोत जेव्हा शाहरुख खानकडे बंदूक सापडली आणि त्या एकूण प्रकरणात बाळासाहेब यांनी शाहरुखची चांगलीच कानउघडणी केली.
-
शाहरुख हा तेव्हा चांगलाच लोकप्रिय झाला होता, त्याचे प्रत्येक चित्रपट हीट ठरत होते.
-
DDLJ चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे शाहरुख यशाच्या शिखरावर विराजमान होता.
-
हा किस्सा आहे ११ जानेवारी १९९७ या दिवशीचा. या दिवशी निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांच्या आगामी ‘रफ्तार’ चित्रपटाच्या मुहूर्तासाठी एक जंगी पार्टी आयोजित केली होती.
-
मुंबईच्या आलीशान ओबेरॉय टॉवर्समध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
-
इतर बॉलिवूड पार्टीप्रमाणे या पार्टीतही बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.
-
फिरोज यांचा ‘रफ्तार’ हा चित्रपट काही कारणाने पूर्ण होऊ शकला नाही. यामध्ये संजय दत्त आणि अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत होते.
-
या आलीशान पार्टीमध्ये कित्येक राजकारणी नेते मंडळींनीही हजेरी लावली होती, त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही हजर होते.
-
‘रेडिफ.कॉम’च्या वृत्तानुसार तेव्हा अभिनेता शाहरुख खानलाही या पार्टिचं निमंत्रण मिळालं होतं. सवयीप्रमाणे शाहरुख पार्टीत उशिरा पोहोचला, तोवर बरीच मंडळी आली होती.
-
शाहरुख पार्टीत शिरणार इतक्यात हॉटेलच्या सिक्युरिटी काउंटरजवळ मेटल डिटेक्टरने शाहरुख खानच्या खिशात पूर्णपणे भरलेलं पिस्तुल पकडलं. सिक्युरिटी गार्डने शाहरुखला या पिस्तुलाचा परवाना दाखवायला सांगितला. सुरक्षेसाठी शाहरुखने ही पिस्तूल बाळगल्याचं स्पष्ट केलं.
-
शाहरुख त्या गार्डशी हुज्जत घालू लागला. परवाना गाडीत असल्याचं कारण त्याने दिलं, पण परवाना दाखवल्याशिवाय अआतमध्ये सोडणार नाही यावर गार्ड ठाम होता.
-
शाहरुख आणि त्या गार्डमधला हा वाद चांगलाच वाढला. त्याच काउंटरवर तो फिरोज यांच्याबद्दलही उलट सुलट बोलू लागला.
-
वाद एवढा वाढला की पार्टीत हजर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यावेळी बाळासाहेब यांनी एका माणसातर्फे एक निरोप पाठवला. बाळासाहेब यांनी शाहरुखची चांगलीच कानउघडणी केली. “परवाना दाखव किंवा पिस्तूल गार्डकडे ठेवून गपचूप पार्टीत ये नाहीतर तुझे कोणतेही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.” या शब्दात बाळासाहेब यांनी शाहरुखला समज दिली आणि मग त्याप्रमाणे परवाना दाखवून शाहरुख त्यानंतर निमूटपणे पार्टीत आला.
-
२०१० मध्येही शाहरुख आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानी खेळाडूंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुखच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटाला तेव्हा शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख