-
‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे नाव आता सगळ्यांनाच परिचयाचं झालं आहे.
-
विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपले मत मांडत असतात.
-
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी हे दोघे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.
-
यावेळी मात्र त्यांनी आपला रोमँटिक अंदाज फोटोतून दाखवला आहे.
-
पत्नी पल्लवी जोशी यांच्या केसात त्यांनी फुल माळले आहे. या फोटोवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
-
पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. या कॉन्सर्टमध्ये दोघांनाही एका कॉमन फ्रेंडनं निमंत्रण दिलं होतं.
-
पहिल्या भेटीत पल्लवी यांना विवेक अग्निहोत्री अजिबात आवडले नव्हते. पल्लवी यांना विवेक उद्धट वाटले होते. पण नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली.
-
त्यानंतर यांची मैत्री वाढत गेली आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर दोघांनी १९९७ साली लग्न केले.
-
विवेक आणि पल्लवी यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वतःची निर्मिती संस्थादेखील आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई