-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये सई ताम्हणकरचं नाव टॉपला आहे.
-
सईने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं.
-
ती इथवरच थांबली नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सईला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं.
-
सई आता अनेक नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसते.
-
आताही तिने एले ब्यूटी पुरस्कार (Elle Beauty Awards) सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळीही उपस्थित होते.
-
पण सई रेड कार्पेटवर अवतरली आणि उपस्थितांचं तिने लक्ष वेधून घेतलं.
-
यावेळी सईने परिधान केलेला ड्रेस विशेष लक्षवेधी होता.
-
या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी सईला ट्रोल केलं आहे.
-
कोणी सईची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. तर कोणी तिला आकाश कंदील म्हटलं आहे. चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला नाही. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”