-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा पतौडी पॅलेस हा कायमच चर्चेत असतो.
-
घराण्याचा वारसा म्हणून मिळलेल्या या पॅलेसमध्ये सैफ अनेकदा आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या घालवताना पाहायला मिळतो.
-
नुकतंच एका जाहिरातीसाठी सैफने त्याच्या पतौडी पॅलेसची सफर चाहत्यांना दाखवली आहे. त्यात तो या घरात फेरफटका मारताना दिसत आहे.
-
यात पॅलेसच्या बाहेरील कारंज्यापासून प्रत्येक खोलीचे दर्शन घडताना पाहायला मिळत आहे.
-
पतौडी पॅलेस १९०० साली उभारण्यात आला होता. जीक्यू मासिकानुसार या पॅलेसमध्ये १५० खोल्या, ७ ड्रेसिंग रुम आणि ७ बाथरुम आहेत.
-
सैफचा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस हा त्याच्यासाठी फारच खास आहे. या पॅलेसला मिळवण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले आहेत.
-
या व्हिडीओत पतौडी पॅलेसमधील चमकणारं झुंबर दिसतं. यानंतर काही जुने फोटोही पाहायला मिळत आहे.
-
यात पतौडी पॅलेसचे दरवाजे आणि तिथे ठेवलेलं फर्निचर अलिशान असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यानंतर सैफ हा पॅलेसच्या गॅलरीत येतो. त्यावेळी दोन्ही बाजूला टेबल लावलेले पाहायला मिळत आहे.
-
तसेच आजूबाजूला जुन्या छायाचित्रांच्या फ्रेम्स ही सुबकपणे लावलेल्या आहेत. तसेच भिंतींवर फोटो फ्रेम्स पाहायला मिळत आहे.
-
त्यानंतर सैफ एका हॉलमध्ये उभा असल्याचे पाहायला मिळते. त्यात त्याच्या पाठीमागे एक मोठा आरसा आहे. त्यात बाहेर बांधलेला जलतरण तलावही यात दिसत आहे.
-
त्याबरोबरच एक लायब्ररीही पाहायला मिळत असून त्यात जुन्या चित्रांची झलक पाहायला मिळते
-
पतौडी पॅलेस हरियाणाच्या गुरुग्राम या ठिकाणी आहे.
-
पतौडी पॅलेस इब्राहिम कोठी या नावाने देखील ओळखला जातो.
-
पतौडीचे शेवटचे शासक इफ्तिकार अली खान यांच्या निधनानंतर हा राजवाडा त्यांचा मुलगा मन्सूर अली खान आणि त्यांची पत्नी शर्मिला टागोर यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
-
हा वाडा आता कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
-
नीमराणा ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून सैफने हा वडिलोपार्जित महाल ८०० कोटींना विकत घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
२००५ पासून ते २०१४ पर्यंत तो निमराना हॉटेल म्हणून ओळखला जात होता.
-
“शंभर वर्षांपूर्वी सैफच्या आजोबांनी त्यांच्या पत्नीसाठी हा आलिशान पतौडी पॅलेस उभारला होता. त्यावेळी ते इथले राजे होते. पण पुढे जाऊन त्या सर्व पदव्या रद्द करण्यात आल्या”, असे सैफने एकदा मुलाखतीदरम्यान म्हटले होते.
-
२०११ मध्ये वडिल मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन झाल्यानंतर सैफला पतौडी पॅलेसबद्दल आकर्षण वाटू लागले. तो कुटुंबाकडे हवा, असेही त्याला वाटले.
-
त्यानंतर जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा सैफने भाडेकरार संपवून रक्कम अदा केली आणि पुन्हा घराचा ताबा मिळवला. (फोटो – Myntra Youtube, Indian express Achieve)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स