-
बॉलिवूड कलाकारांचे मुंबईत आलिशान बंगले आहेत. शाहरुख खान ते अगदी महानायक अमिताभ बच्चन यांचे बंगले चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरतात.
-
बॉलिवूड कलाकरांच्या आलिशान बंगल्यांप्रमाणेच त्यांच्या नावंही खूप खास आहेत.
-
‘मन्नत’ ते ‘प्रतीक्षा’ या सर्वच बंगल्यांची ही नावं ठेवण्यामागे खास कारणं आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या बंगल्याचं नाव ‘शिव शक्ती’ असं आहे.
-
जुहू येथील या बंगल्याचं नाव अजय देवगणच्या वडिलांनी ठेवलं होतं कारण ते शंकराचे खूप मोठे भक्त होते.
-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने लग्नानंतर मुलगी झाल्यास तिचं नाव मन्नत असं ठेवायचं ठरवलं होतं.
-
पण नंतर त्याने मुलीचं नाव सुहाना ठेवलं आणि जेव्हा बंगला खरेदी केला तेव्हा त्याचं नाव ‘मन्नत’ असं ठेवलं.
-
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्याचं नाव ‘रामायण’ असं आहे. ते रामभक्त आहेत.
-
शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची नावं लव आणि कुश अशी ठेवली आहेत तर घराचं नाव ‘रामायण’ असं ठेवलं आहे.
-
बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या निधनाआधी ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहायचे. त्यानंतर त्यांना ‘जलसा’ विकत घेतला.
-
पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचं नाव वडिलांच्या कोणत्या एका कवितेवरून ठेवलं होतं.
-
अभिनेता रणबीर कपूरच्या बंगल्याचं नाव ‘कृष्णा-राज’ असं आहे.
-
या बंगल्याचं नाव रणबीरचे दिवंगत वडिल ऋषी कपूर यांनी आपल्या आईच्या नावावरून ठेवलं होतं.
-
(फोटो साभार- सोशल मीडिया)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख