-
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा व पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
आता दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू झाली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाच्या केळवणांना सुरुवात झाली होती.
-
तसंच अक्षयाची लग्नातली खास साडी विणायचा शुभारंभही मध्यंतरी पार पडला.
-
हार्दिकनेही अक्षयाच्या या खास साडीसाठी धागे विणले.
-
यावेळी अक्षया आणि हार्दिकच्या कुटुंबियांप्रमाणेच त्यांचे मित्र मंडळीही हजर होते.
-
त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या आमंत्रणालाही सुरुवात झाली आहे. या दोघांची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाली.
-
आता अक्षया आणि हार्दिक यांचा जिवलग मित्र अभिनेता अमोल नाईक याने त्यांची लगीन घाई कशी सुरू आहे हे शेअर केलं आहे.
-
अमोलबरोबर अक्षयाची बहीण आणि तिचा नवरा दिसत आहेत.
-
तर या फोटोत अमोलबरोबरलग्नासाठी आतुर असलेले देवधर कुटुंबिय दिसत आहेत.
-
दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.
-
आता ही दोघं कधी मिस्टर अँड मिसेस जोशी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल