-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट आजपासून (१८ नोव्हेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
-
‘दृश्यम’ चित्रपटानंतरच त्याच्या सिक्वेलची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर ७ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल ‘दृश्यम २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
‘दृश्यम २’ चित्रपटाची कथा रंजक असून या चित्रपटात अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.
-
या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर दोन कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
अजय देवगणसह या चित्रपटात तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
‘दृश्यम २’ साठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा हा चक्रावून सोडणारा आहे.
-
अजय देवगणने या चित्रपटात विजय साळगावकर ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री श्रीया सरन त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
-
श्रीयाने चित्रपटात नंदिनी साळगावकर ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने दोन कोटी मानधन घेतले आहे.
-
अभिनेत्री इशिता दत्ताने चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
-
अंजू साळगावकर साकारण्यासाठी इशिताने १.२ कोटी मानधन घेतले आहे.
-
बालकलाकार मृणाल जाधवने चित्रपटात अनु साळगावकरची भूमिका साकारली आहे.
-
यासाठी तिने ५० लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
अक्षय खन्ना या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने २.५ कोटी मानधन घेतले आहे.
-
तब्बू या चित्रपटात पोलीस अधिकारी मीरा देशमुखच्या भूमिकेत आहे.
-
यासाठी तिने ३.५ कोटी मानधन घेतलं आहे.
-
अभिनेता रजत कपूर यांनी ‘दृश्यम’ मध्ये तब्बूच्या पतीची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांनी एक कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.
-
‘दृश्यम २’ साठी सगळ्यात जास्त मानधन अजय देवगणने घेतलं आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगणने तब्बल ३० कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख