-
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुश्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
४७ वर्षांची सुश्मिता सेन ही अद्याप अविवाहित आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे.
-
सुश्मिता ही तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
तिच्या लव्ह लाईफ आणि रिलेशनशिपच्या चर्चा कायमच व्हायरल होताना दिसतात.
-
काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेनचे नाव आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्याशी जोडले जात होते.
-
सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जातं होतं.
-
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सुश्मिताने यावर स्पष्टीकरण दिले.
-
ललित मोदींच्या आधी सुष्मिताचं नाव अनेक व्यक्तींशी जोडलं गेलं.
-
‘दस्तक’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विक्रम भट यांच्याबरोबर सुश्मिताची जवळीक वाढली.
-
पण विक्रम विवाहित असल्याचे समजल्यानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाला. ते नातं जास्त काळ टिकलं नाही.
-
पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमशीदेखील तिचं नाव जोडलं गेलं.
-
पण सुश्मिताची लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस दुनियेतील तिचा असणारा वावर वसीम यांना पटला नाही. त्यानंतर ते नाते संपुष्टात आले.
-
अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर सुश्मिता सेन रिलेशनमध्ये असल्याचे चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.
-
‘कर्मा और होली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं नातं जुळलं. जवळपास ३ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.
-
सुश्मिता ही हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती.
-
त्या दोघांचे बरेच एकत्रित फोटो व्हायरल झाले. पण काही काळाने त्या दोघांचा ब्रेकअप झाला.
-
सुश्मिताचा मॅनेजर बंटी सचदेवा याच्याबरोबरही तिचे रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. पण सुश्मिताचं बंटी सचदेवाबरोबरही पटलं नाही आणि ते वेगळे झाले.
-
हॉटेल उद्योगाशी संबंधित असलेल्या संजय नारंग याच्याबरोबरही सुश्मिताचे नाव जोडले गेले. विक्रम भट्टबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने त्याला डेट करायला सुरुवात केली.
-
सुश्मिता सेन आणि उद्योगपती अनिल अंबानी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अनिल यांनी तिला हिऱ्याची अंगठीही दिली होती, असेही बोललं जातं. पण कालांतराने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.
-
रोहमन शॉल आणि सुश्मिताच्या रिलेशनशिपला २०१८मध्ये सुरुवात झाली.
-
रोहमन सुश्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान होता.
-
पण २०२१मध्ये रोहमन आणि सुश्मिताचे ब्रेकअप झाले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे याबद्दल जाहीर केले होते.
-
दरम्यान आता लवकरच ती ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”