-
अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही सध्या चर्चेत आली आहे.
-
आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
-
आयराने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर त्या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
-
या फोटोत आयरा खान ही लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
-
तर नुपूर हा सूट-बुट घालून पाहायला मिळत आहे.
-
या दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला आहे.
-
आयरा आणि नुपूरच्या या साखरपुड्याला कुटुंबातील तसेच इतर काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.
-
आमिरसह त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनेही लेकीच्या साखरपुड्याला हजेरी लावली.
-
आयरा व नुपूरच्या साखरपुड्यानंतर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
आयरा आणि नुपूरच्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर तो कोण याबद्दल चर्चा सरु झाल्या आहेत. तसेच त्यांची पहिली भेट कुठे झाली होती याबद्दलही अनेकजण चर्चा करताना दिसत आहेत.
-
अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान ही नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत.
-
तिने कायमच नुपूरबरोबर असलेल्या नात्याचा स्वीकार केला.
-
विशेष म्हणजे तिने आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.
-
नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींचा तो फिटनेस ट्रेनिंग देतो.
-
काही दिवसांपूर्वी इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता.
-
या स्पर्धेदरम्यान त्याने आयरासमोर गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं.
-
यावेळी आयराने अगदी हसत त्याला होकार दिला.
-
या दोघांचा एकमेकांना प्रपोझ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.
-
नुपूरने जवळपास तीन वर्षांपूर्वी चक्क न्यू़ड फोटोशूट केलं होतं. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली होती.
-
आमिर खानचा होणारा जावई पण भलताच फिट असल्याचे पाहायला मिळते.
-
तो दिसायलाही अगदी स्मार्ट आहे.
-
जवळपास दोन वर्ष तो सुष्मिता सेनचा फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करत होता.
-
नुपूर शिखरे आणि आयरा खान यांचं एकमेकांच्या कुटुंबियांशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे.
-
नुपूर शिखरेला डेट करण्यापूर्वी ती संगीतकार मिशाल कृपलानीला डेट करत होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर २०२० मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.
-
ब्रेकअपनंतर आयरा खान कोलमडून गेली होती. तिने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले होते.
-
लॉकडाऊनदरम्यान आयरा ही तिच्या वडिलांबरोबर त्यांच्या घरी राहत होती. त्यावेळीच तिची आणि नुपूर शिखरेशी भेट झाली.
-
नुपूर शिखरे आयराचे वडील आणि अभिनेता आमिर खानचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करायचा.
-
वडिलांच्या घरी असताना नुपूर शिखरे आणि आयराची मैत्री झाली.
-
ते दोघे बऱ्याचदा एकत्र असायचे. त्यांनी भरपूर वेळ क्वॉलिटी टाइम घालवला.
-
आयरा फिटनेसबाबत खूप जागरुक असल्याने त्याने तिलाही ट्रेनिंग दिले.
-
आयरा आणि नुपूरच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.
-
यानंतर आयराने नुपूरची ओळख आई रीना दत्ताशी करुन दिली आणि तिनेही त्यांच्या नात्याला संमती दिली.
-
आयरा आणि नुपूर यांनी २०२० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केल्यानंतर अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
नुपूर शिखरेने आयराच्या नावाचा टॅटूदेखील आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे.
-
आयरा खानने फेब्रुवारी २०२१ मध्ये नुपूर शिखरेबरोबरच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.
-
ते दोघेही बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.
-
नुकताच त्या दोघांनीही साखरपुडा केला आहे.
-
त्यानंतर आता आयरा आणि नुपूर लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं