-
जॅकी श्रॉफ आणि पूनम ढिल्लन यांनी आयोजित केलेल्या रियुनियनला दक्षिणात्या चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील ३० पेक्षा जास्त कलाकार उपस्थित होते.
-
८० च्या दशकातील हे कलाकार दरवर्षी ही रियुनियन पार्टी आयोजित करतात.
-
पण करोनामुळे मागच्या दोन वर्षात त्यांच्या रियुनियनचा कार्यक्रम आणि पार्टी होऊ शकली नव्हती.
-
२०१९ मध्ये चिरंजिवी यांच्या हैदराबादमधील घरी १० वर्षांच्या पूर्तीची रियुनियन पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि त्याला जवळपास ४० कलाकार उपस्थित होते.
-
करोनानंतर यंदा या रियुनियनची परंपरा कायम राखत कलाकारांनी मुंबईमध्ये ही पार्टी आयोजित केली होती.
-
अनुपम खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही कलाकारांना टॅग केलं आहे. ज्यात पूनम ढिल्लन, मधू, विद्या बालन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, शक्ती कपूर, व्यंकटेश दग्गुबती, राज बब्बर, रम्या कृष्णन आणि चिरंजीवी कोनिडेला, राजकुमार, सरथकुमार, बघ्यराज, अर्जुन, नरेश, भानुचंदर, सुहासिनी मणिरत्नम, रम्या कृष्णन, लिस्सी, पौर्णिमा बघ्यराज, राधा, अंबिका, सरिता, सुमलता, शोबना, रेवती, नादिया, मीनाक्षी शेषाद्री आणि टीना अंबानी हे दिसत होते.
-
राज बब्बर यांनी हा फोटो शेअर करताना “टाइमगॅप संपवून आम्ही भूतकाळातल्या आठवणीत रमलो. जॅकी आणि जुन्या मित्रांची भेट.” असं कॅप्शन दिलं आहे.
-
याशिवाय अभिनेत्री खुशबू सुंदर यांनीही त्याच्या सोशल मीडिया हॅन्डलवर बरेच फोटो शेअर केले आहेत.
-
“आठवडाभरापूर्वी मुंबईत ८०च्या दशकातील अभिनेते आणि अभिनेत्रींना भेटणे हा सर्वात आश्चर्यकारक आणि आनंददायी अनुभव होता.” असं कॅप्शन अनुपम खेर यांनी या रियुनियनचे फोटो शेअर करताना दिलं.
-
जॅकी श्रॉफ यांनी अनुपम खेर यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याला “अपना भिडू” असं कॅप्शन दिलं आहे.
-
अनिल कपूर यांच्याबरोबरचा फोटो शेअर करताना जॅकी श्रॉफ लिहितात, “माझ्या लखनला भेटणं नेहमीच माझ्यासाठी आनंददायी असतं.”
-
याशिवाय अभिनेत्री मधू यांनीही त्याच्या सोशल मीडिया हॅन्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
हा फोटो शेअर करताना खुशबू सुंदर यांनी लिहिलं, “बोलके फोटो… शब्दांची गरजच नाही.”
-
आणखी काही फोटो शेअर करताना खुशबू सुंदर यांनी, “आपल्या मित्रांना भेटण्यापेक्षा दुसरा कोणताच मोठा आनंद नाही.”
-
(फोटो साभार- खुशबू सुंदर, जॅकी श्रॉफ, राज बब्बर, अनुपम खेर, मधू इन्स्टाग्राम)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का