-
कोणाच्याही आधाराशिवाय हिरो बनण्याचे स्वप्न घेऊन बॉलिवूडमध्ये येणाऱ्यांसाठी रणवीर सिंग हे एक आदर्श आहे.
-
रणवीर सिंग हा एक आऊटसायडर होता, पण त्याच्या मेहनतीमुळे आज तो बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे.
-
पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी रणवीर सिंगने खूप संघर्ष केला आणि कास्टिंग काउचचाही सामना केला.
-
रणवीर सिंगने ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर मिडल ईस्ट अवॉर्ड्समध्ये रणवीरला ‘सुपरस्टार ऑफ द डेकेड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
हा सन्मान मिळाल्यानंतर रणवीर सिंग भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याला त्याच्या संघर्षाचे दिवस आठवले.
-
रणवीरने प्रेक्षकांमध्ये बसलेले वडील जगजीत सिंग भवनानी आणि आई अंजू भवनानी यांच्याकडे पाहिले आणि त्यानंतर आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली.
-
रणवीरने सांगितले की त्याच्या वडिलांनी त्याला पोर्टफोलिओ मिळविण्यासाठी कशाप्रकाराने धावाधाव केली जेणेकरून तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकेल.
-
रणवीर सिंगने हे देखील सांगितले की तो कसा रडायचा आणि नंतर त्याच्या आईला विचारायचा की तो कधी अभिनेता होईल का?
-
फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईटमध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतर रणवीर सिंग भावूक झाला.
-
तो रडत आपल्या आई-बाबांकडे बघून म्हणाला, ‘बाबा तुम्हाला आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी मी किती प्रयत्न करत होतो.’
-
‘मला माझा पोर्टफोलिओ बनवायचा होता. मला वाटलं मी माझं कॉलिंग कार्ड दाखवेन आणि सांगेन की अभिनेता आहे. कृपया मला काम द्या.’
-
‘मात्र पोर्टफोलिओसाठी ५० हजार रुपयांचे कोटेशन मिळाले. मित्र मला म्हणाला एका मोठ्या फोटोग्राफरकडून चांगला पोर्टफोलिओ बनवून घेऊया.’
-
मी बाबांना म्हणालो की ५० हजार रुपये खूप जास्त आहेत. तेव्हा ते म्हणाले, ‘काळजी करू नको, तुझे बाबा तुझ्याबरोबर आहेत.’
-
रणवीर म्हणाला की, तो इतका यशस्वी होऊन या व्यासपीठावर उभा राहील, असे त्याला कधीच वाटले नव्हते. त्याच्यासाठी हा खरोखरच चमत्कार आहे.
-
रणवीर सिंगने आपला पुरस्कार आदित्य चोप्राला समर्पित केला. तो म्हणाला की इतर कोणीही जेव्हा मला संधी दिली नाही तेव्हा त्यांनी मला संधी दिली आणि म्हणाले मला माझा आगामी शाह रुख खान सापडला.
-
रणवीर सिंगने २०१० साली यशराज फिल्मच्या ‘बँड बाजा बारात’मधून पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला होता.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य