-
अभिनेता शाहरुख खान जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो.
-
त्याच्या लाईफस्टाईल बद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं.
-
त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्याचा बंगला ‘मन्नत.’
-
शाहरुखचा बंगला हे आता मुंबईतील एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.
-
शाहरुखचा बंगला ‘मन्नत’ हा प्रत्येकालाच आकर्षित करतो. पण आता या बंगल्याने एका वेगळ्याच कारणाने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
-
शाहरुखच्या बंगल्याला म्हणजे ‘मन्नत’ला नवीन नावाची पाटी लावण्यात आली आहे.
-
काही दिवसांपूर्वी या बंगल्याच्या नावाची पाटी डागडुजीच्या कारणाने काढण्यात आली होती. पण आता त्या जागी एक नवीन पाटी लावण्यात आली आहे.
-
याला ‘डायमंड नेमप्लेट’ असं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. कारण या नावाच्या पाटीमध्ये छोटेछोटे एलईडी लाइट्स लावले आहेत.
-
शाहरुख खानच्या बंगल्याच्या जुन्या गंज लागलेल्या गेटच्या जागी आता काळ्या आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेले एक मोठे गेट लावण्यात आले आहे.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”