-
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आज ३२ वा वाढदिवस साजरा करतोय.
-
आज बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये गणल्या जाणाऱ्या कार्तिकचा इथंपर्यंतचा त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
-
बॉलिवूडमध्ये आउटसायडर म्हणून काम सुरू करणं आपल्यासाठी फार कठीण होतं असं एका मुलाखतीत कार्तिकने सांगितलं होतं.
-
कार्तिकने ऑडिशन आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कॉलेज सोडलं. त्यानंतर ३ वर्षे त्याला मॉडेलिंग करावं लागलं.
-
मुलाखतीत कार्तिक आर्यन म्हणाला, त्यावेळी माझ्याकडे पोर्टफोलियोसाठी पैसे नव्हते. मी ग्रुप फोटोंमधून स्वतःचे फोटो क्रॉप करत असे.
-
कार्तिक आर्यनने पुढे क्रिएटिंग चरकटर्स इंस्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले. मात्र याबाबत त्याच्या आई-बाबांना काहीच माहीत नव्हतं.
-
कार्तिक आर्यनने त्याला पहिला चित्रपट मिळाल्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितलं.
-
इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना कार्तिकने लव रंजन यांचा ‘प्यार का पंचनामा’ साइन केला होता.
-
कार्तिकने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी मुंबईत १२ लोकांबरोबर एका घरात राहायचो. हे सगळेच बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी धडपडत होते.”
-
“आम्ही जिथे राहायचो तिथे भाडं खूप होतं त्यामुळे एकाच अपार्टमेंटमध्ये एवढ्या माणसांबरोबर राहणं भाग होतं. तिथेच राहत असताना मी ‘प्यार का पंचनामा’चं शूटिंग केलं.” असंही तो म्हणाला होता.
-
कार्तिकचा ‘प्यार का पंचनामा’ २०११ मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलं प्रदर्शन केलं. त्यानंतर त्याला ‘आकाश वाणी’ हा दुसरा चित्रपट मिळाला पण तो फ्लॉप ठरला.
-
दुसरा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कार्तिकने आईच्या सांगण्यावरून इंजिनियरिंग डीग्री पूर्ण केली.
-
त्यानंतर कार्तिकने ‘कांची: द अनब्रेकेबल’ ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटात काम केलं पण हेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
-
पण जेव्हा त्याचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र कार्तिकच्या अभिनयाचं जोरदार कौतुक झालं.
-
या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला गती आली. त्यानंतर त्याने ‘लुका छुपी’, ‘पति पत्नी और वो’, ‘भूल बुलैया २’ हे चित्रपट केले. जे बॉक्स ऑफिसवर हीट ठरले.
-
आज कार्तिक बॉलिवूडच्या हीट अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण त्यासाठी त्याला बरेच चढउतार पाहावे लागले आहेत.
-
(फोटो साभार- कार्तिक आर्यन इन्स्टाग्राम)

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?