-
अभिनेत्री मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे.
-
आता मानसीने आपल्या घटस्फोटाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.
-
मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
-
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
-
ती म्हणाली, “घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”
-
तसेच तिने या मुलाखतीमध्ये आपण वैवाहिक आयुष्यामध्ये सुखी नसल्याचंही सांगितलं.
-
गेल्याचवर्षी मानसी व प्रदीपचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता.
-
आता या दोघांच्या नात्याचा दि एण्ड झाला आहे.
-
मानसीचा पती प्रदीप हा एक बॉक्सर तसेच मॉडलदेखील आहे.
-
काही दिवसांपूर्वीच त्याचं ‘आग लगेगी’ हे हिंदी गाणंही प्रदर्शित झालं होतं.
-
मानसीने घटस्फोटाबाबत स्पष्टीकरण दिलं. मात्र प्रदीपने याबाबत मौन कायम राखलं आहे. (सर्व फोटो – फाईल फोटो, फेसबुक )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”