-
मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
-
त्यावर आता मानसी नाईकने मौन सोडलं असून मी घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची कबुली दिली आहे.
-
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर आणि एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केल्यानंतर त्याच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
-
त्यानंतर आता मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळं झाल्याच्या चर्चांची पुष्टी करत यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
-
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने तिच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
-
“माझ्या घटस्फोटाबद्दल ज्या चर्चा सुरु आहे, त्या सर्व खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही.”
-
“मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.”
-
अवघ्या पावणेदोन वर्षांतच मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचा संसार मोडणार आहे
-
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं.
-
मानसी नाईकने फेब्रुवारी २०२० मध्या तिच्या आणि प्रदीपच्या नात्याबद्दलची अधिकृत घोषणा केली होती.
-
मानसी आणि प्रदीप यांचा नोव्हेंबर २०२० मध्ये साखरपुडा झाला होता.
-
त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात ते दोघेही विवाहबंधनात अडकले होते.
-
मानसीने ३ फेब्रुवारी २०२० ला इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यात तिच्याबरोबर प्रदीपही पाहायला मिळत होता.
-
त्यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपबद्दलची अधिकृत घोषणा केली.
-
मानसीने आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी याबद्दलची कबुली दिली होती.
-
यावेळी मानसी नाईक आणि प्रदीप खरेराबरोबर फोटो शेअर करत “मी स्वतःलाच दिलेलं हे सर्वात मोठं वाढदिवसाची भेट” असं सांगितलं होतं.
-
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे बोललं जातं
-
यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये तिने प्रदीपबरोबर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
-
तिने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना ‘भविष्यातील मिसेस खरेरा’ असे म्हटले होते.
-
त्यानंतर त्यांनी प्री वेडींगचे अनेक फोटोही शेअर केले होते.
-
त्यांच्या या फोटोंचीही प्रचंड चर्चा रंगली होती.
-
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते.
-
मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते.
-
पण गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांनाही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले आहेत.
-
अखेर तिने यावर मौन सोडत घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे सांगितले आहे.
