-
अभिनेता कार्तिक आर्यन आज त्याचा ३२वा वाढदिवस साजरा करतोय.
-
कार्तिकने आई-वडिलांबरोबर वाढदिवस साजरा केला.
-
कार्तिकला इंडस्ट्रीमध्ये आता १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याने वयाच्या २१व्या वर्षी ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
आर्यन एकेकाळी वर्सोवामध्ये ज्या घरात भाड्याने राहायचा, तेच घर नंतर त्याने खरेदी केलं. तो आई-वडिलांसह त्या घरात राहतो.
-
कार्तिकजवळ अनेक महागड्या गाड्या आणि घरं आहेत.
-
कार्तिकजवळ बीएमडब्ल्यू 5 सीरीज आहे, त्या कारची किंमत सुमारे ५५ लाख रुपये आहे.
-
याशिवाय, त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी उरूस देखील आहे. तसेच कार्तिकजवळ रॉयल एनफिल्ड क्लासिकदेखील आहे.
-
कार्तिक आर्यनकडे एक मिनी कूपर देखील आहे, ती त्याच्या आईने त्याला भेट म्हणून दिली होती.
-
याशिवाय कार्तिकने नुकतीच मॅक्लारेन जीटी ही नवीन कार खरेदी केली आहे, त्या कारची किंमत सुमारे ४.७ कोटी आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये ही कार फक्त कार्तिककडे आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आधी त्याच्या चित्रपटांसाठी सुमारे ५ ते ७ कोटी रुपये घेत होता. पण भूल भुलैया २ च्या यशानंतर अभिनेत्याने आपली फी वाढवली आहे आणि आता तो एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेतो.
-
caknowledge वेबसाइटच्या अहवालानुसार, कार्तिक आर्यनची एकूण संपत्ती सुमारे 5 मिलियन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ३६ कोटी आहे.
-
कार्तिकची वार्षिक कमाई ६ कोटींच्या आसपास आहे.
-
कार्तिक लवकरच फ्रेडी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच Shehzada चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
(सर्व फोटो – कार्तिक आर्यनच्या फेसबूकवरून साभार)
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक