-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृता अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
-
एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृताच्या ‘चंद्रा’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं होतं.
-
अमृताच्या वाढदिवसानिमित्त याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो प्रसाद ओकने शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
यातील प्रत्येक फोटोला प्रसादने खास कॅप्शन दिलं आहे.
-
पहिला फोटो… आपण वाचन सुरु केलं होतं.
-
दुसरा… आपण रेकीला गेलो होतो तेव्हा बैठ्या लावणीच्या काही “अदा” तू ट्राय करत होतीस.
-
तिसरा… “चंद्रा”ची पहिली लुक टेस्ट.
-
चौथा…दोन वर्षांपूर्वी तुझ्या वाढदिवशीच तुझं शूटिंग चालू झालं होतं.
-
पाचवा…तुझा सगळ्यात आवडता फोटो.
-
सहावा…तुझी आणि मंजूची मस्ती ऑन सेट.
-
सातवा… शूटिंगचा शेवटचा दिवस.
-
आठवा… डबिंगच्या वेळी तुझा आणि मंजूचा टाइमपास.
-
नववा…लूक लॉन्चच्या दिवशी तुझं आणि मंजूचं फोटोशूट.
-
आणि दहावा फोटो काल रात्रीचा…!!!
-
कायम अशीच खुश रहा…तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. तुला माझ्याकडून आणि मंजूकडून वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर प्रेम…!!! (सर्व फोटो: प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना