-
लोककलेच्या माध्यमातून चले जाव चळवळीपासून ते हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा कित्येक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत समाजजागर करणाऱ्या शाहीर कृष्णराव साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेबर २०२२ पासून सुरू झाले आहे.
-
यानिमित्ताने, शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे.
-
यानिमित्ताने केदार शिंदे शाहीर साबळे यांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी रासिकांसमोर आणत आहेत.
-
आता त्यांनी शाहीर साबळे यांच्या घराची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.
-
शाहीर साबळे यांचा जन्म पसरणी या गावी झाला.
-
नंतर अनेक वर्ष ते परेल येथे राहत होते.
-
त्यांच्या घराचा क्रमांक H-27 आहे. तसंच त्यांच्या घरच्या दाराबाहेर एक पत्रपेटी आहे. या पेटीवर त्यांचा घर क्रमांक लिहिलेला आहे.
-
त्यांच्या घरच्या दारावर गोंड्याचं सुंदर तोरण आहे.
-
या घराला पारंपरिक लाकडी दरवाजा आहे. त्या दरवाजावर शाहीर साबळे यांच्या नावाची लाकडी पाटीही आहे. त्यांच्या या घराला राजा मयेकर, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर अशा अनेक मान्यवर कलाकारांचे पाय लागले. प्रसन्नतेने आणि सकारात्मक उर्जेने असं परिपूर्ण हे घर आहे.
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित