-
‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं ऐकलं तरीही आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंत हे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते.
-
या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे.
-
अभिजीत सावंत हा इंडियन आयडल या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचला.
-
इंडियन आयडलचे पहिले पर्व अभिजीत सावंतने जिंकले होते.
-
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान त्याने इंडियन आयडलमुळे त्याचे आयुष्य कसं बदललं? याबद्दल सांगितले.
-
“मी इंडियन आयडलचा विजेता ठरल्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनी माझी स्तुती केली होती.”
-
“ती ऐकून मी भारावून गेलो होतो. त्यावेळी लोकांकडून मिळालेलं प्रेम, आंनद यातून काही दिवसांनी सावरणं गरजेचं होतं.”
-
“इंडियन आयडलचा पहिला शो इतका लोकप्रिय होईल, असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं.”
-
“मी शो जिंकल्यावर घरी आलो तेव्हा आमच्या पालिकेच्या क्वार्टरच्या बाहेर खूप गर्दी जमली होती.”
-
“जणू काही भारताने पाकिस्तानला हरवलंय आणि कोणीतरी क्रिकेटर तिथे येऊन बसलाय. लोकांनी ढोल ताशा आणि बँड आणला होता.”
-
“माझ्या घराबाहेर एक छोटं ग्राऊंड आहे तिथं लोकांनी गर्दी केली होती.”
-
“कॉलनी, सोसायटीच्या लोकांसह बाहेरचे बरेचसे लोक तिथे आले होते.”
-
“एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं, ती एक वेगळीच क्रेझ होती.”
-
“तेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हतं. त्यामुळे कोणताही अभिनेता अप्रोचेबल नव्हता. पण अशावेळी लोकांकडून खूप सारं प्रेम मिळालं.”
-
“ज्या उत्साहाने लोक आजही मला भेटतात ते बघून मला खूप आश्चर्य वाटतं.”
-
“फरक फक्त इतकाच आहे की, जेव्हा तरुण मुलंमुली येतात आणि सांगतात की, आमचे मम्मी पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत ,तेव्हा बदल झालाय असं जाणवतं.”
-
“पूर्वीचे तरुण मंडळी मला म्हणायचे की मी तुमचा फॅन आहे. आता त्यांचं वय वाढलंय. पण आजही त्यांना मी आवडतोय हे ऐकून आनंद वाटतो.”
-
“इंडियन आयडलचा शो संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मासिकाने त्यांच्या फ्रंट पेजवर मी शोमध्ये हेराफेरी केल्याची बातमी छापली. ती बातमी वाचल्यानंतर माझी ट्रेनिंग सुरु झाले होते.”
-
“या इंडस्ट्रीत कसं राहायचं? निगेटिव्हिटीपासून स्वतःला लांब कसं करायचं हे मी त्यावेळी शिकलो.”
-
“यानंतर काही दिवसांनी आणखी एक बातमी प्रसिद्ध झाली. ज्या बातमीचं हेडिंग होतं, अभिजीत सावंत झाला बेघर. तर दुसऱ्या एका बातमीत मला मुंबईच्या नव्हे तर दिल्लीच्या मुली आवडतात, असेही लिहिण्यात आले होते.”
-
“अजून एक विचित्र बातमी छापून आली होती. मी मुंबईत एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी मी सतत प्रवास करायचो.”
-
“त्यामुळे मी जाड झालो होतो. त्यात मी घट्ट असा टीशर्ट घातला होता. त्यात माझं पोट दिसत होतं.”
-
“त्यावेळी तिथे माझा फोटो काढला आणि पेपरमध्ये छापला. त्याखाली मला याला यश पचलेलं दिसत नाही, असंही लिहिण्यात आलं होतं.”
-
“आज पण रोज माझ्या वाचनात येतं की मी कुठंतरी गायब झालोय, पण मी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही.” असे तो म्हणाला

नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच