-
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणून भाऊ कदम यांना ओळखले जाते.
-
विनोदाचे बादशाह अशी त्यांची सर्वत्र महाराष्ट्रात ओळख आहे. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली.
-
‘पांडू’ चित्रपटात ते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बरोबर दिसले होते. प्रेक्षकांनी या दोघांची जोडी आवडली.
-
भाऊ कदम जरी कामात व्यस्त असले तरी ते आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत असतात.
-
आपल्या कुटुंबाबरोबर त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. श्री सिद्धिविनायक असा कॅप्शन त्यांनी दिला आहे.
-
सिद्धीविनायक मंदिरात जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले तसेच सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची भेट घेतली.
-
भाऊ कदम सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
-
भाऊ कदम यांना ४ अपत्यं असून त्यांची मोठी मुलगी मृण्मयी कदम सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
भाऊ कदम यांनी आपल्या कारकिर्दीत संघर्ष केला आहे. त्यांनी अनेक चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”