-
‘दंगल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
‘दंगल’ या पहिल्याच चित्रपटाने तिला ओळख मिळवून. यातील तिच्या कामाचीही चांगलीच प्रशंसा झाली.
-
यानंतर तिने बऱ्याच चित्रपटात काम केलं. त्यापैकी ‘लुडो’ आणि नुकत्याच आलेल्या ‘थार’ या चित्रपटातील तिची भूमिका वेगळी होती.
-
फातिमा तिचे बोल्ड लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
नुकतंच तिने आमिर खानची मुलगी आयरा खानच्या साखरपूरड्याच्या सोहळ्यात तिने हजेरी लावली.
-
या सोहळ्यात इतरही बऱ्याच सेलिब्रिटीजनीही हजेरी लावली होती.
-
यादरम्यानचे आयरा खानबरोबरचे फोटोज फातिमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते.
-
या साखरपुड्यात फातिमा एका पांढऱ्या एथनिक वेशभूषेमध्ये दिसली.
-
बॅकलेस टॉपमध्ये फातिमा बोल्ड दिसत आहे.
-
तिने या वेशभूषेतील फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत.
-
फोटोबरोबर तिने जे कॅप्शन शेअर केलं त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
-
या फोटोखाली तिने लग्नगाठ बांधू की नको बांधू असा सवाल केला आहे. तिच्या या कॅप्शनमुळे चाहत्यांना वेगळीच उत्सुकता लागली आहे.
-
फातिमाच्या या पोस्टमुळे ती लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत अजूनही तिने काहीच स्पष्टीकरण दिलं नसलं तरी चाहत्यांनी फातिमाला कॉमेंटमध्ये लग्नाविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे.
-
मध्यंतरी आमिर खानने त्याची पूर्वपत्नी किरण रावशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरचं नाव फातिमा सना शेखशी जोडलं गेलं होतं. हे दोघे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत अशा अफवासुद्धा उडाल्या होत्या.
-
आमिर आणि फातिमा या दोघांनी याविषयी अजूनपर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण फातिमाच्या या पोस्टमुळे पुन्हा या चर्चेला उधाण आलं आहे. (फोटो सौजन्य : फातिमा सना शेख / इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख