-
खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे कधी राजकीय, सामाजिक तर कधी चित्रपटांमुळे चर्चेत असतात.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांचा बहुचर्चित ‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले.
-
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला.
-
डॉ. अमोल कोल्हे यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अनेकदा ते त्यांच्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करत असतात.
-
डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतचं एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी काही फोटो शेअर केले असून ते पुस्तक वाचन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
“वेळेचा सदुपयोग! काल माझा मित्र वैभव शेटकर याने हे पुस्तक भेट दिलं…मित्र मनातलं ओळखतात की काय”, असे त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
-
“पण सक्तीची विश्रांती सत्कारणी लावण्याची सोय झाली.. पुस्तकाविषयी व्हिडिओ लवकरच…”, असेही त्यांनी म्हटले आहे.
-
अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या मानेला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात त्यांनी मानेसाठी पट्टा लावल्याचे दिसत आहे.
-
त्यांच्या या फोटोवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘मानेची काळजी घ्या अमोलजी !’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स