-
रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्व माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (७७) यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. (Indian Express)
-
सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि दोन कन्या असा परिवार आहे. (Indian Express)
-
गेल्या काही वर्षांपासून गोखले यांना मधुमेहाचा विकार होता. त्यातच श्वसन घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. (Indian Express)
-
शुक्रवारी त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आशादायक चित्र असले, तरी शनिवारी प्रकृती पुन्हा खालावली आणि दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. (Indian Express)
-
गोखले यांचे पार्थिव दुपारी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सतीश आळेकर, सुबोध भावे, राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेकांनी गोखले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (Indian Express)
-
सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रम गोखले यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (Indian Express)
-
दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे देशातील पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई कामत यांचे नातू आहेत. दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. (twitter : @FilmHistoryPic)
-
१९०० च्या दशकाच्या सुरुवातीस, स्त्रियांना चित्रपट किंवा थिएटरमध्ये काम करणे निषिद्ध होते, म्हणून भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटात प्रथमच स्त्री पात्रे साकारण्यासाठी पुरुष कलाकारांचा वापर केला गेला.
-
फाळके यांचा दुसरा चित्रपट मोहिनी भस्मासुर (१९१३) मध्ये दुर्गाबाई कामत यांनी देवी पार्वतीची भूमिका साकारली आणि त्या भारताच्या पहिल्या अभिनेत्री झाल्या. त्याच चित्रपटात त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी मोहिनीची भूमिका केली होती. (twitter : @FilmHistoryPic)
-
गेल्याच महिन्यात त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांची भूमिका साकारली होती. (Instagram : avni.taywade)
-
त्यापाठोपाठ विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. (Instagram : Jitendra joshi)
-
विक्रम गोखले गेल्या काही काळापासून घशाच्या दुखण्याने त्रस्त होते. यामुळेच त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. तर सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचेही काम करत होते. त्यांच्या निधानाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Instagram : Nana Patekar)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड