-
‘आय एम कलाम’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अभिनेता म्हणजे हर्ष मायर.
-
त्याने ‘गुल्लक’ या सिरीज मध्ये केलेले कामही सर्वांच्या पसंतीस पडले. या सिरीजमध्ये त्याने अमन मिश्रा हे पात्र साकारले होते.
-
गेली काही वर्ष तो सुकन्या राजन हिला डेट करत आहे.
-
त्या दोघांचे बरेच फोटो ही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आता नुकताच तो विवाह बंधनात अडकला आहे.
-
त्याने २५ नोव्हेंबर रोजी त्याची गर्लफ्रेंड सुकन्या राजन हिच्याशी लग्न केले.
-
या लग्नातील एक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहेत.
-
त्यांच्या लग्नात त्याने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती तर सुकन्याने गुलाबी रंगाचा घागरा घातला होता.
-
या फोटोवर कमेंट करत त्याचे चाहते त्या दोघांना लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत.

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल