-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
-
मानसी नाईकने नुकतीच ‘ईसकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसीने वैवाहिक आयुष्याबरोबरच तिच्या करिअरबद्दलही भाष्य केलं.
-
‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळालेली मानसी अनेक चित्रपटांत आयटम सॉंग करताना दिसली.
-
मानसीला नृत्याची विशेष आवड आहे.
-
“नृत्यामुळे अभिनय मागे पडत गेला का?” असा प्रश्न मानसीला या मुलाखतीत विचारण्यात आला.
-
यावर उत्तर देत मानसी म्हणाली “मी कुठलंच काम लहानमोठं मानत नाही. कलाकार लहानमोठा असतो. त्याची मानसिकता लहानमोठी असते”.
-
पुढे मानसी म्हणाली, “माझ्यासाठी प्रत्येक काम सरस्वती आहे. त्यामुळे मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. कुठल्याही भाषेतील चित्रपट जेवढा गाजतो त्यातीलच गाणंही तेवढं हिट होतं”.
-
“प्रेक्षक, दिग्दर्शक एक कलाकार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवत असतील, तर मी का करायचं नाही. नृत्यामुळे माझा अभिनय हरवला जाईल असं मला वाटतं नाही”.
-
“नृत्य करते म्हणून मी अभिनेत्री नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल”, असंही मानसी म्हणाली.
-
“कुठलंही प्रोजक्ट आपल्याला निवडतं. आपण कोणत्याच गाण्याला किंवा चित्रपटाला निवडत नाही, असं मला वाटतं”.
-
“मराठी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना ही अभिनेत्री पुढे नेऊ शकते, हा विश्वास माझ्यावर दाखवला गेला आहे”, असंही ती म्हणाली.
-
पुढे इमरान हाशमीचा उल्लेख करत मानसी म्हणाली, “वाट बघतोय रिक्षावाला, मस्त चाललंय आमचं, बाई वाड्यावर या, एकदम कडक ही गाणी सुपरहिट आहेत. माझी सगळीच गाणी गाजतात. त्यामुळे मला मी मराठीतील इमरान हाशमी वाटते”.
-
मानसी नाईकने केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
-
मानसीच्या संसारात वादळ आलं आहे. मानसी नाईकने बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या प्रदीप खरेराशी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली.
-
आता अवघ्या दोन वर्षातचं मानसीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
(सर्व फोटो: मानसी नाईक/ फेसबुक)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”