-
छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व रंजक दिवसेंदिवस होत चाललं आहे.
-
पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे.
-
आता ‘बिग बॉस’ने संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक मोठे सरप्राईज दिले आहे.
-
बिग बॉसच्या घरात चार नवीन सदस्यांची घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
-
बिग बॉसच्या घरात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत या चौघांची दमदार एन्ट्री झाली आहे.
-
अभिनेता विशाल निकम हा बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचे विजेता आहे.
-
तर अभिनेता आरोह वेलणकरने हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील सदस्य आहे.
-
त्याबरोबरच ‘बिग बॉस मराठी ३’ शोमुळे घराघरात पोहोचली लोकप्रिय अभिनेत्री मीरा जगन्नाथने पुन्हा एकदा घरात एंट्री घेतली आहे.
-
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वापासूनच एका नावाची सातत्याने चर्चा होती ती म्हणजे एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत.
-
राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात कधी जाणार? असा प्रश्न सातत्याने समोर येत होता.
-
अखेर बिग बॉस मराठीच्या चौथ्या भागात राखी सावंतची एन्ट्री झाली आहे.
-
राखीची एन्ट्री होताच तिने अपूर्वा नेमळेकरसह विकास सावंतचीही शाळा घेतली.
-
राखीने घरात पाऊल ठेवताच तिने अपूर्वाला ‘ऐ शेवंते…’ म्हणत तिला आवाज दिला आणि अपूर्वाला हसू फुटले.
-
“या सर्वांची आई आहे मी, बिग बॉसची पहिली बायको… अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार…”, असे अस्लखित मराठीत राखी सावंत म्हणाली.
-
आता राखीबरोबरच विशाल, मीरा आणि आरोह घरात आल्यानंतर खेळ कसा बदलणार ? त्यांना काय स्पेशल पॉवर मिळणार ? घरातील नाती किती बदलणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”